आम्ही सगळेच toonycon !!!
लहान मुलांना toonycon बघायला घेऊन आलो. वाटलं काय गंमत यात.. सगळेच खोटे मुखवटे आणि वेष घालून आभास निर्माण करणारे. आपल्याला माहितीय दिसायला छोटा भीम, शिंग चॅन, mighty राजू पण आत मध्ये कुणी भलतंच असतं..लहान मुलं त्यांना ते ते character मानतात म्हणून सगळा खेळ जुळून येतो...त्याच्या नावाने tvshows, Tshirt, पुस्तके, काही च्या बाही... सगळाच धंदा !!!

नंतर विचार केला की आपण मोठे लोक(वयाने) तरी कुठं वेगळे असतो... आपणही कुठं खरं खोटं करून बघतो... जो तो आपल्याला जसा मुखवटा घालून दाखवतो , त्याला आपण तेच मानतो . कधी त्याला सुपरस्टार म्हणतो, god, demiगॉड म्हणतो, बाबा , बुवा, महात्मा,MSG, हा अवतार तो अवतार अशी काय काय नावे देतो...वैयक्तीक आयुष्यात third grade असलेला कलाकार, राजकारणी, समाजसेवक यांचे बुरखे/मुखवटे यांना भुलतो. कुणी कुणाचा हृदयसम्राट,तात्या, अप्पा, अण्णा ,दादा.. तर कुणी कुणाचा मासिहा बनतो. मग आपण त्यांच्या नावाचे स्तोम माजवतो, गल्लोगल्ली त्यांची सुंदर फ्लेक्स लावतो किंवा लावलेले फ्लेक्स बळजबरीने बघतो... त्यांच्याच नावाखाली एकमेकांशी भांडतो आणि त्यांतच आपलाही खेळ होतो.हे सगळं आपल्यालाही भूल घालतं...कारण मनांत कुठं तरी आपल्यालाही आवडतंच असतं..सत्य सोडून आभासी आणि मायावी असत्य किंवा अर्धसत्य.त्याचंच नाव..ToonyCon...!!!
फेसबुक वर अनेकांच्या पोस्ट बघा, फोटॊ बघावं तर असं वाटतं " जगी सर्वसुखी असा हा एकच आहे", संध्याकाळी जेवणाची भ्रांत पण दिवसभर "भाऊंचीच हवा", "एकच दादा" असे फोटोवर मेसेज. घरात गल्लीत कुत्रं विचारत नाही, पण फेसबुकवर जगाचे ज्ञान देणार.
कारण सगक्यांना आवडते toonycoon.
Comments
Post a Comment